मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोकण दाैरा केला. यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली. आता यावर शिवसेना नेते व खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपने पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलेलं आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत., असा टोमणा विनायक राऊतांनी नारायण राणेंना यावेळी लगावला.
दरम्यान, भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून नारायण राणेंचा उल्लेख होतो. त्यांच्या रुग्णालयात आरटी-पीसीआर चाचणीसाठी जास्तीचे पैसे घेतले जात आहेत. भूखंड हडप करणारा म्हणजे नारायण राणे, असा जोरदार हल्लाबोल विनायक राऊतांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“मराठा आरक्षण आणि छत्रपतींच्या सन्मानाविषयी कोणीही भाजपला शिकवण्याची गरज नाही”
बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे- खासदार छत्रपती संभाजीराजे
सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काय दिलं?; नारायण राणेंचा घणाघात
हे कुणाचे टूलकिट आहेत?, त्यांची एवढी हिंमत कशी झाली?; उर्मिला मातोंडकर रामदेव बाबांवर संतापल्या