Home महाराष्ट्र “महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात”

“महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात”

मुंबई : राज्यात 10 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि परीक्षा बोर्डांना काही सवालही केलेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी अशाप्रकारे खेळ योग्य नसल्याचं मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

“महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. करोनाच्या ताणाबरोबर बोर्डाच्या परिक्षा होणार की नाही? या तणावाला लाखो विद्यार्थी, पालक सामोरे जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत योग्य निर्णय घ्यावा, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

कोरोना साथीमुळे राज्यात गंभीर परिस्थिती उद्भवली आहे, हे जरी खरे असले तरी कोणत्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे दीर्घकालीन नुकसान होणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे. उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतरही राज्य सरकारने दहावी, बारावी परीक्षांच्या प्रश्नावर तोडगा काढला नाही. मुख्यमंत्र्यांना या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठीही वेळ नाही. मुळात ज्या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या तीन तासात कोकणातला वादळ दौरा आटोपला त्या मुख्यमंत्र्यांना या परिक्षांचे महत्त्व आहे की नाही हा ही प्रश्न आहे, असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटल्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सचिन सावंताची टीका; म्हणाले…

राजीनामा देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन- संभाजीराजे

“पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, म्हणून ते संभाजीराजेंना भेटले नाहीत”

“मुंबई उपनगरात आदित्य ठाकरेंना दाखवा, 18 ते 44 वयोगटातील लसीकरण फुकट मिळवा”