मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणचा दौरा केला. पंचनामे होताच मदत करण्याची घोषणा केली. मुख्यंत्र्यांच्या या घोषणेवरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारचे कान पिळेन, अशी जाहीर ग्वाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना दिली होती. त्याच कोकणात आज त्यांच्या सुपुत्राने संकटग्रस्त कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. आज बाळासाहेब असते, तर कोकणाची दुर्दशा पाहून त्यांना काय वाटले असते?,” असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
“ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं, त्या शिवसेनेनं कोकणाला वाऱ्यावर सोडून दिलं. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या कोकणाच्या कोकणवासीयांची निराशा उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केली, असं म्हणत केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी निसर्ग वादळानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्पेटवर उभे राहून दुरूनच पाहणीचे नाटक केलं होतं. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अजून मिळालेली नाही आणि मुख्यमंत्र्यांना याचा पत्ताच नाही. आता मुख्यमंत्री आताच्या संकटाचे पंचनामे दोन दिवसात पूर्ण करून नुकसानभरपाई देण्याची खोटी आश्वासने देत आहेत. गेल्या वर्षी भरडलेल्या कोकणची पुन्हा नवी थट्टा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोकणी जनताच प्रश्न विचारेल, हे नक्की,असंही केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
पाहून त्यांना काय वाटले असते?
ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं, त्या शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडून दिले. शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या कोकणाच्या कोकणवासीयांची निराशा @OfficeofUT सरकारने केली. ..३— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा- नवाब मलिक
सांगली जिल्ह्यात लाॅकडाऊन वाढणार; पालकमंत्री जयंत पाटलांनी दिले संकेत
“जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करा”