मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकण दाैऱ्यावर होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत 2 दिवसात मदत जाहीर करणार, असं म्हटलं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री आले कोकण दाैऱ्यावर आणि तसेच परत गेले. काही दिलं नाही. आणि 2 दिवसानंतर जाहीर करतो असं सांगून निघून गेले. मग तुम्ही आला कशाला? कुणी बोलवलं तुम्हाला? मुख्यमंत्री ही एक जबाबदारी आहे. यांना मुख्यमंत्रीपदच कळलेलं नाही. ते मजा मारताहेत. त्यांना असं वाटतंय की, मी असा राऊंड मारून गेलो, म्हणजे सगळं काही होतं असं होत नाही, अधिकाऱ्यांना कळलं नाही, तुम्ही कशासाठी आलात. काय सुचना दिल्यात तुम्ही? 10 मिनिटांत जेमतेम रत्नागिरीमध्ये आणि तास-दीडतास सिंधुदुर्गामध्ये. येण्या-जाण्यामध्येच तुमचा वेळ गेला. आढावा कसला घेतला, काय बघितलंत तुम्ही?, कसली पाहणी केली, नुकसानग्रस्तांना भेटला देखील नाही, असा हा मुख्यमंत्री. कशासाठी झालात तुम्ही मुख्यमंत्री? एकतर आल्यापासून वाटच लावतोय मुख्यमंत्री महाराष्ट्राची., अशी जोरदार टीका निलेश राणेंनी यावेळी केली.
मागचे अजून निसर्ग चक्रीवादळाचे पैसे अजून दिले नाहीत. याच्यापेक्षा मग येऊ नका ना कोकणामध्ये. आम्हांला बोलायला संधी देखील मिळणार नाही. हेच जे आज मुख्यमंत्र्यांनी केलं, ते घरी बसून पण फक्त व्हिडिओ काॅलवर बघू शकत होते. जेंव्हा तुम्हांला कोणाला भेटायचंच नव्हतं. मदतच जाहीर करायची नव्हती तेंव्हा झक मारायला तुम्ही आले कशाला मुख्यमंत्री कोकणामध्ये. बसा ना घरी, जसं रोज बसता., असा हल्लाबोल निलेश राणेंनी केला.
काय मस्करी चालवलीय कोकणाला आज काही दिलं नाही. हलाख्याच्या परिस्थितीत लोकं आहेत, मरताहेत. कसं जगताहेत, त्यांच्याकडे अन्न नाहीये. लाईट नाहीये, पाणी नाहीये. लाईटीचे पोल पडलेले आहेत, जीवाचा धोका आहे, अशा वेळेला तुम्ही कोणाला न भेटता फक्त फेरफटका मारणार आणि निघून जाणार. काय लाज वाटते का नाही तुम्हांला. काही तरी देऊन गेलं असता, ते वाटलं नसतं. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची जाणीव तरी आहे का? काय करावं लागतं मुख्यमंत्री पदावर, कसं वागावं लागतं, काय करावं लागतं, नसेल माहीत तर कोणाकडून तरी शिकून घ्या. लाज वाटते अशा मुख्यमंत्र्याची आम्हाला, असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.
मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर का आले?? pic.twitter.com/w0pe7RmiC3
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“३ तासाच्या कोकण दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी किती गावांना भेटी दिल्या”
सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे हे दीड वर्षांनी बाहेर पडले- चंद्रकांत पाटील
“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”
“मोदी संवेदनशील, ते महाराष्ट्रालाही मदत करतील, मात्र मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही”