सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी चिवला बीचवरील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील असं म्हणत, मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना यावेळी लगावला.
कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून 2 दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात 1 जूननंतर लाॅकडाऊन कायम?, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…
“वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला, तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?”
राष्ट्रवादीच्या हटवादासमोर उद्धव ठाकरेंना झुकावं लागलं; अतुल भातखळकरांची टीका
“देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला भडकवण्याचं राजकारण बंद करावं”