Home महाराष्ट्र फक्त श्रध्दांजली वाहून आणि मेणबत्ती पेटवून समाज बदलणार नाही- रुपाली चाकणकर

फक्त श्रध्दांजली वाहून आणि मेणबत्ती पेटवून समाज बदलणार नाही- रुपाली चाकणकर

मुंबई : हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून मारण्याची धक्कादायक घटना घडली होती. अखेर त्या तरुणीची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली. आज सकाळी 6.55 वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूनंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रितिक्रिया दिली आहे.

आम्हाला उध्वस्त करण्याचा अधिकार कोणी दिला या नराधमांना?,  माणसाच्या कळपातील या हिंस्र श्वापदांचा नायनाट झाला पाहिजे. फक्त श्रध्दांजली वाहून आणि मेणबत्ती पेटवून समाज बदलणार नाही. तर खरी गरज आहे सामाजिक प्रबोधनाची आणि स्त्रीला माणुस म्हणुन सन्मान देण्याची, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

खुप अस्वस्थ वाटतंय आज सकाळपासूनच पीडित मुलीची आणि तिच्या पालकांची मी नागपुरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली होती. मुलीला खुप जवळून पाहिलं होतं तेव्हापासुन तिचा चेहरा नजरेसमोरून जात नव्हता, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी हळहळ व्यक्त केली.

दरम्यान, ती या दुर्घटनेतुन सुखरूप बाहेर यावी यासाठी आपण सर्वजणच प्रार्थना करीत होतो, असंही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, खुशाल गोळी मारा; असदुद्दीन ओवैसी यांची संतप्त प्रतिक्रिया

“ती आपल्यातून निघून गेली, पण तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी”

त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा; हिंगणघाट प्रकरणावर निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया

जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे- पिडीतेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया