देवगड : तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबई, कोकण आणि गुजरात किनारपट्टीला बसला. महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकण दाैऱ्यावर जाणार आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?, असे प्रश्न करत मुख्यमंत्री केवळ बाता मारत आहेत, असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला. देवेंद्र फडणवीस आज देवगडमध्ये आहेत. देवगडमध्ये बंदरावर येऊन त्यांनी मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा टोला लगावला.
दरम्यान, वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का? असं म्हणत, गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळीही सरकारने काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत, असा घणाघात फडणवीसांनी केला.
महत्वाच्या घडामोडी –
राष्ट्रवादीच्या हटवादासमोर उद्धव ठाकरेंना झुकावं लागलं; अतुल भातखळकरांची टीका
“देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला भडकवण्याचं राजकारण बंद करावं”
पदोन्नतीचा विषय मार्गी लावला, पोलिस भरतीबाबतही लवकरच निर्णय घेऊ- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील