मुंबई : ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवून जे मराठा आरक्षण आहे ते अतिरिक्त आरक्षण दिले पाहिजे ही पहिल्यापासून राज्य सरकारची भूमिका आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि भाजप दोन्ही बाजुने खेळ खेळत आहे. त्यांनी कधी ओबीसी समाजाला, तर कधी मराठा समाजाला भडकवण्याचं राजकारण बंद करावं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
“देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे 16 टक्के आरक्षण योग्यच आहे तशी भूमिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मांडावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करावी, असा सल्ला नवाब मलिक यांनी फडणवीसांना यावेळी दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर राज्य सरकारला अधिकारच नाही असा निकाल दिला आहे. संसदेत केंद्राने राज्याचा अधिकार अबाधित राहिल असे स्पष्ट केले होते. परंतु सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यावर केंद्राने फेरविचार याचिका दाखल केली आहे. मात्र ती महाराष्ट्रासाठी नसून इतर सर्व राज्यं तुटून पडणार असल्यानं दाखल केलीय.असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
पदोन्नतीचा विषय मार्गी लावला, पोलिस भरतीबाबतही लवकरच निर्णय घेऊ- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
उद्धव ठाकरेंचा कोकण दाैरा म्हणजे लिपस्टीक दाैरा; नितेश राणेंचा घणाघात
“कोकणाने शिवसेनेला आत्तापर्यंत खूप काही दिलं, आता शिवसेनेने कोकणाला देताना हात आखडता घेऊ नये”
“महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”