मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोपरगावचा अचानक दौरा केला होता. यावर कोपरगावचे आरटीआय कार्यकर्ते संजय काळे यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा ओलांडण्यासाठी आवश्यक असणारा ई-पास काढला होता का?, असा प्रश्न संजय काळे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच या दौऱ्याच्या अनुषंगाने काळे यांनी माहितीच्या अधिकारात राज्याच्या मुख्य सचिवांकडे अर्ज केला आहे. फडणवीस यांनी जिल्ह्याची सीमा ओलांडण्यासाठी नियमानुसार अर्ज केला आहे का?, असा सवालही काळे यांनी यावेळी केला.
दरम्यान, फडणवीसांच्या कार्यक्रमासाठी पक्ष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच हा कार्यक्रम कोविड सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. तेथे कोरोनाचे रुग्ण दाखल आहेत. अशा ठिकाणी गर्दीचे कार्यक्रम घेतले तर साथ कशी आटोक्यात येणार. यापूर्वीही आम्ही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या तक्रारी वेळोवेळी केल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली जात नाही, असंही काळे यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा; डाॅ.प्रीतम मुंडेचं पंतप्रधान मोदींना पत्र
मोदी गुजरात दाैऱ्यावर तर फडणवीस कोकण दाैऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा- चित्रा वाघ
महाराष्ट्रासाठी पुढचे 10 दिवस महत्त्वाचे- आरोग्यमंत्री राजेश टोपे
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे; ठाकरे सरकारचा निर्णय