मुंबई : गेल्या 2-3 दिवसांपासून तौक्ते चक्रीवादळाने गुजरात, कोकण आणि दीवला झोडपून काढलं आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातचा हवाई पाहणी दौरा करणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकण दौऱ्यावर आहेत. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
वादळ तौक्ते ने झालेलं नुकसान त्यासाठीची मदत व सर्वात महत्वाचे लोकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान गुजरातेत तर विरोधीपक्षनेता देवेंद्र फडणवीसजी कोकणात पोहोचलेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात किमान मुंबईत तर दौरा करा त्रस्तजनता मातोश्रीबाहेर आंदोलन करते आता तरी निघा, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
वादळ #तौक्ते ने झालेलं नुकसान त्यासाठीची मदत व सर्वात महत्वाचे लोकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान गुजरातेत तर विरोधीपक्षनेता @Dev_Fadnavis ji कोकणात पोहोचलेत@CMOMaharashtra ji तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात किमान मुंबईत तर दौरा करा
त्रस्तजनता मातोश्रीबाहेर आंदोलन करते आता तरी निघा— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 19, 2021
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रासाठी पुढचे 10 दिवस महत्त्वाचे- आरोग्यमंत्री राजेश टोपे
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे; ठाकरे सरकारचा निर्णय
“अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”
“उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत हे मोदींनाही पटलं असेल”