Home महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी पुढचे 10 दिवस महत्त्वाचे- आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्रासाठी पुढचे 10 दिवस महत्त्वाचे- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : कोरोनापाठोपाठ महाराष्ट्राला म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी या आजाराने देखील त्रासले असून त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत, म्युकरमायकोसिस आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकार योग्य ती पावलं उचलत असून महाराष्ट्रासाठी पुढचे 10 दिवस महत्त्वाचे आहेत, असं म्हणत चिंता व्यक्त केली.

दरम्यान, राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे 800 ते 850 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आत्ता 2 लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत असून हा साठा 31 मेनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत, असं म्हणत राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी –

पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मागे; ठाकरे सरकारचा निर्णय

“अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा”

“उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत हे मोदींनाही पटलं असेल”

महाराष्ट्रात ताैक्ते वादळाचा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?; पंतप्रधानांच्या गुजरात दाैऱ्यावरून राष्ट्रवादीचा सवाल