Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत हे मोदींनाही पटलं असेल”

“उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत हे मोदींनाही पटलं असेल”

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत, असं संजय राऊत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रात ताैक्ते वादळाचा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?; पंतप्रधानांच्या गुजरात दाैऱ्यावरून राष्ट्रवादीचा सवाल

चंद्रकांत पाटलांनी ज्योतिष सांगण्याचा नवा व्यवसाय उघडलाय, त्यामुळे…; संजय राऊतांचा टोला

राज्यात 1 जूननंतर लाॅकडाऊन वाढणार?, आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करणं हेच मोदी सरकारचे धोरण- राहुल गांधी