Home महाराष्ट्र “महाराष्ट्र संकटात असताना अमृता फडणवीसांना शेरोशायरी सुचते, यामधून त्यांना सत्तेची लालसा दिसून...

“महाराष्ट्र संकटात असताना अमृता फडणवीसांना शेरोशायरी सुचते, यामधून त्यांना सत्तेची लालसा दिसून येते”

मुंबई : मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं.

तूफां तो इस शहर में अक्सर आता है ,देखें अबके किसका नंबर आता है !, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

राज्यावर तौक्ते चक्रीवादळाचे संकट ओढावले असताना अमृता फडणवीस संवेदनशीलपणा दाखवण्याऐवजी राजकीय शेरोशायरी करतात. यामधून त्यांना असणारी सत्तेची लालसा दिसून येते. राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीने संकटकाळात अशाप्रकारे वागणे योग्य नाही, असं म्हणत उमेश पाटील यांनी अमृता फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करतात. अशा कठीण प्रसंगात सरकारवर संकट येईल अशी शेरोशायरी करणं योग्य नाही, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वर्तन माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला न शोभणारे आहे, असा हल्लाबोल उमेश पाटील यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

छोटी शहरं आणि गावातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयानं योगी सरकारला सुनावलं

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा; रुपाली चाकणकरांचा केंद्र सरकारला टोला

मराठा क्रांती मोर्चात पूर्ण ताकदीने उतरणार; भाजपची घोषणा

“मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरती”