मुंबई : लोकांचा आवाज दाबण्याची ही केंद्रसरकारची कायरता आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
दाओसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही लसगुरु बनल्याचे जाहीर केले होते. यूएनमधील भारतीय दुतावासाने सांगितले की, जितके लसीकरण भारतात झाले नाही त्यापेक्षा जास्त लस विदेशात पाठवण्यात आली आहे. आता केंद्रसरकार मात्र एक कोटी पाठविल्याचे सांगत आहे. तर काहीजण पाच कोटी कंपल्सरी पाठवायच्या होत्या म्हणून पाठवल्याचे बोलत आहेत. जेव्हा देशात लस उपलब्ध होत नाहीय तेव्हाच प्रश्न उपस्थित केले जात आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, परदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच. किती लोकांना भाजप सरकार अटक करणार आहे? असा सवाल करत नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरती”
“मुंबईकरांचे जे नुकसान झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही”
तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है…; रूपाली चाकणकरांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, आणि…; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला