Home महाराष्ट्र “ठाकरे सरकार शिवसेना भवनावरून करिना, कतरिनाला पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”

“ठाकरे सरकार शिवसेना भवनावरून करिना, कतरिनाला पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”

मुंबई : ठाकरे सरकार कोरोनाची खरी परिस्थिती लपवण्यासाठी बॉलिवूड कलाकारांकडून ट्विट करवून घेते. त्यासाठी शिवसेना भवनावरून अनेक कलाकारांना फोन केले जातात, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.

सरकारी तिजोरीत खडखडाट असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडिया अकाऊंटस सांभाळण्यासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. तसेच ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिले आहे., असं नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी आज मुंबईत टी.व्ही.9 मराठीशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, ही एजन्सी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यात 1 जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

“महाराष्ट्र मॉडेल…महाविकास आघाडीच्या आमदारावर जर दिवसाढवळ्या गोळीबार होत असेल तर…”

केंद्रावर खापर फोडण्याची राज्य सरकारची खेळीदेखील न्यायालयात उघडकीस आली- केशव उपाध्ये

“कोल्हापूरमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडकडीत लाॅकडाऊन जाहीर”