Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं भाग्य”

“उद्धव ठाकरेंसारखा स्वातंत्र्य देणारा मुख्यमंत्री लाभला हे माझं भाग्य”

मुंबई : उद्धव ठाकरेंसारखी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून लाभले हे माझं भाग्य आहे, असं म्हणत मुंबईचे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं काैतुक केलं आहे.इकबालसिंग यांनी नुकतीच इंडियन एक्सप्रेसला मुंबईमधील कोरोना नियंत्रण मॉडेलसंदर्भात मुलाखत दिली. त्यात ते बोलत होते.

या मुलाखतीमध्ये इकबाल सिंग यांना मुंबईप्रमाणेच इतर ठिकाणीही कोरोनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. असं असतानाच कोणी कोणती जबाबदारी घ्यावी हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. ही जबाबदारी म्हणजे केवळ राजकीय जबाबदारी नाही तर प्रशासकीय स्तरावरील जबाबदारी वाटू घेताना अनेक ठिकाणी अडचणी येत असल्याचं तुम्हांला वाटतं का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर देत उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.

अनेक गोष्टींसाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो. पहिली गोष्ट म्हणजे मला असे मुख्यमंत्री मिळाले ज्यांनी मला निर्णय घेण्यासंदर्भातील स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे मी आवश्यक निर्णय तातडीने घेऊ शकलो. हे स्वातंत्र्य इतर अनेक शहरांमध्ये काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी, मागील मे महिन्यात मुंबई महानगरपालिकेमध्ये रुजू झालो. त्यावेळी मी माझ्या अंतर्गत काम करणाऱ्या टीमला हा विषाणू काही लवकर आपला निरोप घेणार नाही, असंही स्पष्ट केलं होतं., असं इकबाल सिंग म्हणाले.

दरम्यान, आपल्याला एका मोठ्या लढाईसाठी तयारी करणं गरजेचं आहे असं म्हणत, ही तयारी कदाचित एक, दोन किंवा तीन वर्षांसाठी असेल. तेंव्हापासूनच आम्ही यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली. आता या सर्व यंत्रणा जवळजवळ ऑटोपायलेट मोडवर काम करतात. आज दिवसाला दोन हजार, पाच हजार किंवा 10 हजार रुग्ण शहरात आढळून आले तरी यंत्रणांवर ताण येत नाही. ही यंत्रणा नियोजित पद्धतीने अगदी बरोबर काम करतात. मला कोणाचाही कशासाठीही फोन येत नाही, असंही इकबाल सिंग म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

प्रवीणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की…- रुपाली चाकणकर

“…तर आधी जयंत पाटलांनी महाराष्ट्रातील गोरगरिबांसाठी आलेला तांदूळ कुठे विकला त्याचा खुलासा करावा”

“प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण?”

देवेंद्रजींसह सर्वांना हात जोडून विनंती की…; नितीन गडकरींचं भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन