मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काल जनतेशी संवाद साधत मराठा आरक्षणावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हात जोडून विनंती केली होती की, मराठा आरक्षण आता आपला अधिकार आहे. त्यामुळे काश्मीरचं 370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली, तीच हिंमत आणि संवेदनशीलता आम्हाला आता पाहायची आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यानंतर यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दूरचित्रवाणीवरील भाषण मोठ्या अपेक्षेनं ऐकलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी ते काही भरघोस उपाय जाहीर करतील, अशी अपेक्षा होती., असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
किमान ठाकरे सरकारने चुका केल्यामुळे मराठा समाजाचे असलेले आरक्षण हातचे गेले त्याबद्दल क्षमा याचना तरी करतील, असं वाटलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी काय केले तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी एका शब्दाने दिलगिरी व्यक्त केली नाही, अशी टाकी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली .
दरम्यान, मराठा समाजासाठी आता ठाकरे सरकार काय करणार तर केंद्र सरकारला पत्र पाठवून मागणी करणार, हा निराश करणारा दृष्टिकोन आहे. मराठा समाजातील तरुण–तरुणींना आरक्षण मिळेपर्यंत शिष्यवृत्ती, वसतिगृहे, व्यवसायासाठी अत्यंत कमी व्याजदराचे कर्ज आणि मार्गदर्शन अशा प्रकारे मदत भाजपा महायुती सरकारने केली होती, तसेच मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं आता सरकारनं आता बंद केलं पाहिजे, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“पंतप्रधान मोदींनी छत्रपती संभाजीराजेंना भेटीसाठी वेळ का दिली नाही?”
“आदु… तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडुन तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त”
आसाराम बापूंना ICU मध्ये केलं दाखल; काही दिवसांपूर्वी झाली होती कोरोनाची लागण
“मराठा आरक्षण हा पेटवापेटवीचा विषय नाही, हे विरोधकांनीही नीट समजून घेतले पाहिजे”