Home महाराष्ट्र “…तर महाराष्ट्र लवकरात लवकर कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”

“…तर महाराष्ट्र लवकरात लवकर कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी आज सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधला. यावेळी केंद्र सरकारकडे लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे.

“18 ते 44 वयोगटातील 6 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी जे 12 कोटी डोस आपल्याला आवश्यक आहे. हे सर्व 12 कोटी डोस एक रकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. मी केंद्राला पुन्हा विनंती करतो की आमची पूर्ण तयारी आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

जास्तीत जास्त लसीचा साठा उपलब्ध करून दिला, तर महाराष्ट्र लवकरात लवकर या कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही,आपल्या सर्वांना एकत्र काम करावं लागेल- देवेंद्र फडणवीस

“राज्यातील शाळांना 1 मे पासून सुट्टी जारी”

राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

सरकारला चूक कळली, राज ठाकरेंची ‘ती’ मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली मान्य