कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोमवारी (26 एप्रिल) होणाऱ्या जोतिबा डोंगरावरच्या यात्रेवरसुद्धा कोरोनाचं सावट आलं आहे. जोतिबा यात्रेमधील मानकऱ्यांच्या केलेल्या तपासणीत तब्बल 5 मानकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे राज्यातील अनेक सण, समारंभ, यात्रा, जत्रा रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या सर्व धार्मिक मोजक्या तसेच मानाच्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील जोतिबा यात्रासुद्धा आगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत काही मानकऱ्यांच्या उपस्थितीतच पार पडणार होती.
दरम्यान, सोमवारी ही यात्रा असल्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून मानकरी तसेच जोतिबा डोंगरावरील इतर लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी जोतिबा यात्रेदरम्यान पारंपरिक विधी करणाऱ्या मानकऱ्यांपैकी तब्बल 5 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे या यात्रेवर कोरोनाचं सावट आलं आहे. तसेच मानकऱ्यांसोबतच जोतिबा डोंगरावरील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचेसुद्धा समोर आले आहे.
महत्वाच्या घडामोडी –
सुजय विखे यांनी त्या बाॅक्समधून नेमकं काय आणलं?- रूपाली चाकणकर
जडेजा पडला आख्ख्या RCB संघावर भारी! चेन्नईचा 69 धावांनी विजय
“राऊतांनी फुकटचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला असता तर अर्थव्यवस्थेला गती देता आली असती”
“…पण विश्वासघात झाला आणि आम्ही विरोधक झालो”