मुंबई : धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधला वाद काही जनतेला नवा नाही. या दोन कुटुंबांमधले वाद लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये देखील पाहायला मिळाले आहेत. मात्र, त्यापलीकडे जाऊन या बहीण-भावंडांमध्ये असलेलं नातं देखील काही प्रसंगी समोर येतं.
शनिवारी संध्याकाळी भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यावर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणं आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचं समजलं. ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेनं लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्या व्हिडिओतील माहितीचा संदर्भ ट्वीटमध्ये दिला आहे.
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांना काही लक्षणे आढळल्यामुळे त्या उपचार घेत असल्याचे समजले.
ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार व काळजी घ्या.
प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकरच बऱ्या व्हाल, ही खात्री व सदिच्छा व्यक्त करतो. @DrPritamMunde— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
ऑक्सिजन निर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्याने गायब केला- प्रसाद लाड
“जोतीबा यात्रेवर कोरोनाचं सावट; मानकरीच पाॅझिटिव्ह आल्याने यात्रा रद्द”
सुजय विखे यांनी त्या बाॅक्समधून नेमकं काय आणलं?- रूपाली चाकणकर
जडेजा पडला आख्ख्या RCB संघावर भारी! चेन्नईचा 69 धावांनी विजय