Home पुणे “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर यांचं दीर्घ आजारानं...

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर यांचं दीर्घ आजारानं निधन”

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष, प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरूण निगवेकर यांचं आज पुण्यात राहत्या घरी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते.

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम हे निगवेकर यांचा उल्लेख ‘भारतातील शैक्षणिक गुणवत्तेचे पितामह’ असा करत. तसेच 1998 ते 2000 या काळात ते पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर कार्यरत होते. यानंतर 2000 ते 2005 या कालावधीत त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद भूषवले होते.

तुम्ही हे वाचलंत का?

ऑक्सिजनसाठी सातारा-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद

दरम्यान, याशिवाय शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ‘नॅक’चे ते संस्थापक संचालक देखील होते.

महत्वाच्या घडामोडी –

ऑक्सिजनसाठी सातारा-कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर टँकर अडवला; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद

महाराष्ट्राला ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवठा वाढवा; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

“देवों का देव महादेव फेम अभिनेता मोहित रैनाला कोरोनाची लागण”