Home महाराष्ट्र “भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं”

“भाजपचे नेते रेमेडेसिविर इंजेक्शन विकत घेऊन सरकारला देणार होते, हे सपशेल खोटं”

मुंबई : रेमडिसिवीर इंजेक्शनवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच, आम्ही ब्रूक फार्माकडून रेमडेसिविर इंजेक्शन्स विकत घेण्यासाठी अन्न आणि औषध खात्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून परवानगी घेतल्याचा दावा भाजपचे नेते करत होते. यावर डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप रेमडीसीविर विकत घेऊन मला देणार होते अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम व सोशल मीडिया वर सुरू असून ते सपशेल चुकीचं आहे. कुठल्याही पक्षाला रेमडीसीविर वैयक्तिक रित्या विकता येत नाही किंवा वाटता येत नाही ते त्यांना सरकारलाच द्यावं लागतं, असं शिंगणे यांनी स्पष्ट केलं आहे.

तुम्ही हे वाचलात का?

अनुभवी रोहितवर नवखा पंत पडला भारी; दिल्लीचा मुंबईवर 6 गडी राखून विजय

दरम्यान, भाजपमधील काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. तुम्ही आमच्या सप्लायरकडून रेमडेसिविर इंजेक्शन्स खरेदी करावीत, असं त्यांनी मला सांगितलं. आता ते मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल, असा विश्वास शिंगणे यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

“महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शहा म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”

माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, की…;राजेश टोपेंचं राज्यातील नागरिकांना आवाहन

“राज्यात 15 दिवसांचा लाॅकडाऊन लागणार”