Home महाराष्ट्र “हिमंत असेल तर भाजपने अनंतरकुमार हेगडेंना पक्षातून बाहेर काढून दाखवावं”

“हिमंत असेल तर भाजपने अनंतरकुमार हेगडेंना पक्षातून बाहेर काढून दाखवावं”

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसतंय. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी निषेध व्यक्त केला आहे.

महात्मा गांधींवरती जी टिका केली आहे त्याचा मी जाहिर निषेध करतो. जे पंतप्रधान संपूर्ण देशातील गांधीजींच्या स्मारकासमोर नतमस्तक होतात त्यांच्याच पक्षातील लोक गांधीजींची चेष्टा करतात. त्याबद्दल नरेंद्र मोदींनी पुर्ण भारताची नाही तर जगाची माफी मागायला हावी, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

या देशातील पहिला आतिरेकी नतुराम घोडसेचा सन्मान करत ज्या साधवी प्रज्ञा आणि अनंतरकुमार हेगडेंनी गांधीजीं बद्दल जे वक्तव्य केलं. हिमंत असेल तर भाजपने या दोघांना पक्षातून बाहेर काढून दाखवावं, असंही आव्हाड म्हणाले.

जी किती दिवस झेलमध्ये राहिले याची कल्पना अनंतकुमार हेगडेंना नसेल. एका कपड्यावर ते संपूर्ण देश फिरले हेही त्यांना माहित नसेल. गांधीजींच सत्याचे प्रयोग हे पुस्तक हेगडेंनी वाचलं नसेल, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अनंतकुमार हेगडीं केलेल्या वक्तव्यावर प्रत्यृत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शेलार पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री”

अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?; आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्याविरोधात एकेरी भाषा

दिल्लीत प्रचाराला बोलावलं अण् चिठ्ठ्या वाटायला लावल्या; चंद्रकांत पाटील ट्रोल

शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली- रामदास आठवले