नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजले आसून महाराष्ट्रातून भाजपचे काही नेते दिल्लीला गेले आहेत. यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही प्रचारासाठी दिल्लीत गेले असून त्यांचे कार्यकर्त्यांसोबत दिल्लीच्या गल्लीबोळात फिरून प्रचाराच्या चिठ्ठ्या वाटत असल्याचे फोटो सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.
चंद्रकांत पाटलांचे दोन फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहेत. या फोटोत चंद्रकांत पाटील दिल्लीच्या गल्लीबोळात कार्यकर्त्यांसोबत फिरून प्रचाराच्या चिठ्ठ्या वाटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.
दिल्लीत प्रचाराला म्हणून बोलावलं अन् चिठ्ठ्या वाटायला लावल्या. भाजपवाले दिल्लीत महाराष्ट्राची अब्रू घालवत आहेत, अशी टीका एका नेटकऱ्याने केली आहे. तर मराठी म्हणून वाईट वाटलं पण हे त्याच लायकीच आहेत, अशी टीका करत एका नेटकऱ्याने खंत व्यक्त केली आहे.
दिल्लीला प्रचाराला म्हणून बोलावलं अन चिठ्ठ्या वाटायला लावल्या. भाजपवाले दिल्लीत महाराष्ट्राची अब्रू घालवत आहेत. pic.twitter.com/fLb4ukaxjj
— Dnyaneshwar Pomane (@PomaneSpeaks) February 2, 2020
मराठी म्हणून वाईट वाटलं पण हे त्याच लायकीच आहे…
— मराठी बाणा (@a3vaIq9WfU9qMdV) February 2, 2020
महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह काही आघाडीचे भाजप नेते दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराला गेले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली- रामदास आठवले
महाराष्ट्रात NRC कायदा लागू होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे
न्यूझीलंडला व्हाईटवॉश देत भारताने रचला इतिहास
“गांधीजींच्या नावाने छाती ठोकणारे पवार कोंबडी, मासे खाऊन गांधीजींची पुण्यतिथी साजरी करतात”