सिंधुदुर्ग : मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे यांनी लिहिलेल्या पत्रात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर नियुक्तीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला होता. त्यावरुनच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आज अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्याला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर पलटवार केलाय.
ज्याचं राजकीय आयुष्यचं मेवा लूबाडण्यात गेलं त्या नारायण राणेंनी अनिल परब किंवा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचं धारीष्ठ करू नये, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
तुम्ही हे वाचलात का?
नारायण राणेंच्या विरूद्ध आमच्याकडे अनेक पुरावे आहेत. उद्योगमंत्री असताना नारायण राणेंनी अनेक जमिनी हडप केल्या. या जमिनी वन खात्याच्या किंवा एमआयडीसीच्या असतील. त्यांची अनेक प्रकरणं आज सुद्धा बाहेर येत आहेत. त्यामुळे ज्याचं आयुष्यचं लुबाडणूकीत गेलं त्यांनी अनिल परबना शहाणपणा शिकवण्याची गरज नाही, असं विनायक राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
इथं माणसं मरत आहेत, तुम्ही मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय करताय?- नारायण राणे
“ज्यांनी राज्यातल्या घराघरात भांडणं लावली, त्यांच्याच घरात आता टोकाची भांडणं आहेत”
“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”