मुंबई : बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्यानं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहित सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. यावर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे काहींना ज्ञात नसेल, असं धनंजय मुंडे म्हणाले.
तुम्ही हे वाचलात का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रडत लक्ष्मी आहेत; नारायण राणेंचा हल्लाबोल
अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या 2 लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत,त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्याप्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या.हे काहींना ज्ञात नसेल. @DrPritamMunde pic.twitter.com/9EjHxh1Rqp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल!, असंही धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटलं.
ताई साहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! @Pankajamunde @DrPritamMunde
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“ज्यांनी राज्यातल्या घराघरात भांडणं लावली, त्यांच्याच घरात आता टोकाची भांडणं आहेत”
“भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप”