Home महाराष्ट्र बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहितीये त्यामुळे…; पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेवर अप्रत्यक्ष निशाणा

बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहितीये त्यामुळे…; पंकजा मुंडेचा धनंजय मुंडेवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना एक पत्र लिहिलं आहे.

REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या 2 लाख पैकी बीडलाही पुरेसे vaccine मिळाले पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे. जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत, असं ट्विट करत पंकजा मुंडेंनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे पत्रात

प्रति, आरोग्यमंत्री राजेश टोपे

बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 729 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या 34 हजार 989 असली तरी त्यातील 30 हजार 478 रुग्ण बरे झाले आहेत.

एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.

तुम्ही हे वाचलात का?

भाजपचा आमदार फुटला तर, आश्चर्य वाटू देऊ नका- जयंत पाटील

आपणास विनंती आहे की, आपण यात जातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या 2 लाख लसींपैकी बीडला राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ 20 लसी मिळाल्या आहेत. ही अतिशय खेदजनक बाब आहे. तथापि याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेसे Vaccine उपलब्ध करुन द्यावेत आणि तशी व्यवस्था आपण करावी आणि संबंधित यंत्रणेला सूचित करावे., अशा अनेक मागण्या पंकजा मुंडेंनी या पत्रात केल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

2024 च्या निवडणुकीत काँग्रेस असेल सर्वात मोठा आणि सत्तेतील प्रमुख पक्ष- नाना पटोले

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा बो’ल्ड लुक मधील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का?; अजित पवारांचा टोला