बेळगाव : देवेंद्र फडणवीस हे बेळगाव पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असं वक्तव्य महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी केलं आहे. शुभम शेळके यांनी गुरुवारी बेळगावात ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.
गेल्यावेळी आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सीमाप्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली होती. तेव्हा आताच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा महाराष्ट्रातील कोणताही नेता प्रचारासाठी येणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. पण तसे झाले तर तो नेता महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्रोही असल्याचे सिद्ध होईल, असं शुभम शेळके यांनी म्हटलं आहे.
तुम्ही हे वाचलात का?
महाविकास आघाडीचं सरकार कधी पडेल हे अजित पवारांना माहिती- चंद्रकांत पाटील
बेळगावातील मराठी जनता जागी झाली आहे. भाजपकडे मुद्दे काहीच नाहीत. त्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पाडण्याची त्यांची खेळी आहे. पण मराठी माणसांचे डोळे उघडले आहेत. राष्ट्रीय पक्षांचा ढोंगीपणाचा बुरखा फाटला आहे. त्यांच्या डावपेचांचा मराठी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवर काहीही फरक पडणार नाही, असंही शुभम शेळके म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
चंद्रकांत पाटील हा मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस – अजित पवार
ठाकरे सरकारकडून करोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडेवारीची लपवाछपवी; किरीट सोमय्यांचा आरोप