नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता CBSE Board Exams 2021 रद्द करण्याच्या मागणीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर अधिकाऱ्यांध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, शिक्षण सचिव आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांबरोबर आज चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर शिक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, 4 मे 2021 ते 14 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावीचे निकाल बोर्डाकडून विकसित केल्या जाणाऱ्या ऑबजेक्टिव्ह निकषांच्या आधारे निश्चित केले जाणार आहे. या आधारावर एखादा उमेदवार जर त्याला/तिला देण्यात आलेल्या गुणांमुळे समाधानी नसेल त्याला परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. या परीक्षा तेव्हा घेतल्या जातील जेव्हा परिस्थिती अनुकूल असेल., असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
महत्वाच्या घडामोडी –
आता ‘या’ शहरात रात्री बाहेर पडलात तर होणार Corona चाचणी! पहा व्हिडिओ
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा; मोदींना पत्र लिहून केल्या ‘या’ प्रमुख मागण्या
“उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण”
ब्रेक द चेन नव्हे तर चेक द ब्रेन; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला