मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना रुग्णांची हेळसांड होणारे अनेक फोटो, व्हिडिओ समाजमाध्यमांवर येऊ लागले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
कुठल्याही क्षणी काय होईल हे सांगता येत नाही अशी राज्यात अवस्था आहे, कचऱ्याचा गाडीमध्ये मृतदेह नेला जातो, सरणाला लाकडे नाहीत, खुर्चीत बसून ऑक्सिजन दिला जात आहे. जे राज्यात चित्र दिसत आहे ते एक पंचमांशचा भाग आहे, राज्यात कोरोनाबाबत दयनीय अवस्था आहे., असं म्हणत दरेकर यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
प्रशासकीय अनास्था असल्यानेच राज्यात कोरोना विषयक उपचार यंत्रणा उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचंही म्हणत दरेकरांनी सरकारवर टीका केली.
दरम्यान, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आम्ही भाजप कार्यकर्ते सांगाल ते काम करू, वाट्टेल ते करा, पण लोकांचे जीव वाचवा, असंही दरेकर यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया; मुख्यमंत्र्यांकडून नववर्षाच्या शुभेच्छा
“पंढरपूरमध्ये फडणवीसांच्या सभेत पावसाची हजेरी; भाजपलाही पावसाच्या चमत्काराची आस”
जे राजकारण सुरू आहे त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, लोकांचा जीव महत्त्वाचा- आदित्य ठाकरे