पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवेढ्यात सभा घेतली. या सभेला पावसाने हजेरी लावली पाऊस सुरू झाल्यानंतरही जयंत पाटील यांनी व्यासपीठ न सोडता आपली सभा आणि भाषण सुरूच ठेवलं. यावरुन माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधलाय.
जयंत पाटील यांनी यांनी पावसात भिजण्यापेक्षा 35 गावांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा. तुम्ही भिजण्यापेक्षा शेतकऱ्याची जमीन भिजवा, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला.
दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने बोराळे गावात भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी खोत उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
…तर संघर्ष अटळ आहे; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला इशारा
बेअरस्टो, पांडेचे झुंजार अर्धशतकी खेळी व्यर्थ ; कोलकाताचा हैदराबादवर 10 धावांनी विजय
“शरद पवारांच्या सभेची पुनरावृत्ती, फक्त यावेळी पावसात भिजले जयंत पाटील”