मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री ‘मातोश्री’मधून बाहेर पडत नाही, ते कोरोना रुग्णांना कसं सांभाळणार? असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
ठाकरे सरकारमधील नेते केंद्र सरकार मदत करत नसल्याची टीका करत आहे. मात्र, कोरोनावर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सरकार कमी पडलं आहे. हे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकारमधील नेते केंद्रावर टीका करत आहे, असा पलटवार नारायण राणेंनी यावेळी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, लसीच्या तुठवड्याबाबत ठाकरे सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. तसेच वरुन विरोधीपक्षांनी राजकारण करु नका, असं सांगतायेत. मात्र, केंद्राने मुबलक मदत करुनही ठाकरे सरकार राजकारण करत आहे, असंही राणे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! 11 एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली!
महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत
MPSC ची परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?; अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांवर ट्विट