मुंबई : राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहाता येत्या 11 एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. परीक्षार्थींच्या सुरक्षेसाठी सरकारने हा निर्णय घावा, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी दीडच्या सुमारास बोलावलेल्या तातडीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या परीक्षा नंतर कधी घेतल्या जातील, त्याविषयी देखील निर्णय झाल्यावर कळवण्यात येईल, असं देखील या बैठकीत ठरल्याचं सांगितलं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो; विजय वडेट्टीवारांनी दिले संकेत
MPSC ची परीक्षा पुढे ढकला; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?; अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांवर ट्विट
किमान संकट काळात तरी राजकारण करू नका; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना सुनावलं