मुंबई : राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी दोघांमध्ये MPSC ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात चर्चा झाली.
एमपीएससीची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. मात्र, वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. मात्र, आता विद्यार्थ्यांची भूमिका पूर्णपणे बदलली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?; अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांवर ट्विट
किमान संकट काळात तरी राजकारण करू नका; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना सुनावलं
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“दादा मास्क काढा” भाषणादरम्यान अजित पवारांना चिठ्ठी; त्यावर अजित पवार म्हणतात…