मुंबई : सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझेंच्या या आरोपांना आता स्वत: अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे.
“दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं, असं अनिल परब म्हणाले आहेत. पत्रकार परिषदेत अनिल परब बोलत होते.
सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. एक आरोप माझ्यावर, एक अनिल देशमुख आणि एक आरोप अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून घोडावत यांचं नाव घेण्यात आलं आहे”, असं परब यांनी म्हटलंय.
दरम्यान, आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
मागेल त्याला ‘कोरोना व्हॅक्सिन’ द्या; अशोक चव्हाण यांची मागणी
‘कोरोना लसींबाबत केंद्राशी चर्चा करा, माध्यमांशी बोलून हात झटकणं बंद करा- देवेंद्र फडणवीस
केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे- नाना पटोले
“ठाकरे सरकारची अवस्था ‘कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नही’ अशी झालीये”