Home महाराष्ट्र “अनिल देशमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का? “

“अनिल देशमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का? “

मुंबई :. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजिनामा दिला. याच पार्श्वभूमीवर शिवेसनेने आजच्या सामना अग्रलेखातून अग्रलेखातून विरोधीपक्षावर निशाणा साधलाय.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचा हवेत गोळीबार होत असताना उच्च न्यायालयाने त्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्याच वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरच स्थगिती आणली आहे. म्हणजे देशमुख यांना वेगळा न्याय आणि येडियुरप्पांना वेगळा न्याय. हा काय प्रकार मानायचा?, असा सवाल शिवसेनेनं सामनामधून केला आहे.

यापूर्वीही महाराष्ट्रात विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवर आरोप करुन धुरळा उडवला आहे. अनेकदा मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना जावे लागले आहे, पण त्यांच्यात आजच्या विरोधी पक्षांप्रमाणे द्वेष आणि विखार भरलेला नव्हता. विरोधी पक्षाच्या हातात खरोखरच काहीतरी पुरावे होते म्हणून हल्ले केले. आज साबणाचे बुडबुडे सोडून ‘बॉम्ब बॉम्ब’ अशी भीती निर्माण केली जात आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

एकीकडे पवार माझे बाप म्हणायचं आणि दुसरीकडे…; रुपाली चाकणकरांची चित्रा वाघ यांच्यावर टीका

जिल्हा परिषद शाळेमधल्या हा मुलाने केलेला डान्स होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

लॅाकडाऊन नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा जनतेतून उद्रेक होईल- उदयनराजे भोसले

मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला मोठा धक्का; विधानसभेच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश