मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा महाराष्ट्र दुय्यम सेवा परिक्षेवर अनिश्चिततेचं सावट आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी केली आहे.
‘लॉक डाऊन’ असताना रविवारी (ता.11) होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती. असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात रोहित पवारांनी ट्विट केलं आहे.
‘लॉक डाऊन’ असताना रविवारी (ता.११) होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती.@OfficeofUT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“येत्या 40 दिवसांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल”
“देशमुखांचा राजीनामा ही तर सुरुवात, आगे आगे देखो होता है क्या?”
“कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष लॉकडाऊन, सरकार महाराष्ट्राची फसवणूक करतंय”