मुंबई : मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपविण्याचा निर्णय दिला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. तसेच अॅड. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी आणखी 3 याचिकावरही सुनावणी झाली.
मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय देशमुख यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. तसेच मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले. तर परमबीर सिंग यांची याचिका फेटाळली आहे.
दरम्यान, मुंबई हायकोर्टानं अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआयला 15 दिवसांमध्ये परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. तसेच मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.
While hearing on Dr Jaishri Patil’s plea regarding allegations of former Mumbai Police Commissioner Param Bir Singh, Bombay High Court says Anil Deshmukh is the Home Minister and no impartial probe can be done by the police.
— ANI (@ANI) April 5, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या पॅकेजावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“अभिनेता अक्षय कुमारची तब्येत बिघडली, रूग्णालयात केलं दाखल”
“भाजपला धूळ चारत नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर महाविकास आघाडीने झेंडा फडकवला”
आत्ताची कोरोनाची स्थिती भयानक, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस