मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय.टिका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं. आता यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्राची वाट लावणे..महाराष्ट्र विकायला काढणे..कुटुंबा पलीकडे नाही बघणे..म्हणजे महाराष्ट्र सांभाळणे म्हणतात!!! मग उद्धव ठाकरेना तुमच्या कडेच ठेवा..आणि रोज उठून सलाम ठोकत बसा..आव्हाड साहेब!!!, असं ट्विट करत नितेश राणेंनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्राची वाट लावणे..
महाराष्ट्र विकायला काढणे..
कुटुंबा पलीकडे नाही बघणे..
म्हणजे महाराष्ट्र सांभाळणे म्हणतात!!!
मग उद्धव ठाकरेना तुमच्या कडेच ठेवा..
आणि रोज उठून सलाम ठोकत बसा..
आव्हाड साहेब!!!— nitesh rane (@NiteshNRane) April 3, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
“IPL च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू निघाला कोरोना पाॅझिटिव्ह”
“टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे”
माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत- प्रवीण दरेकर