मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केलं जाणार आहे. तर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वगळता बाकी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्यात आलं होतं., असा मोठा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे.
RTE च्या अंतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेत आहोत. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आपण प्रयत्न करत होतो की मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे, परंतु कोरोनामुळं ते शक्य झालं नाही, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दरम्यान, आपल्याला माहीत आहे, राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन, यूट्युब याच्या माध्यामातून शिक्षण सुरू ठेवलं. पहिले ते चौथीच्या शाळा या शाळेमध्ये सुरू करू शकलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या. परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या तर काही ठिकाणी त्या सुरू होऊ शकल्या नाहीत, असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“IPL च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू निघाला कोरोना पाॅझिटिव्ह”
“टिका करणं सोपं आहे, पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे”
माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत- प्रवीण दरेकर
“मोदी सरकारने महाराष्ट्राला किती मदत केली हे फडणवीसांनी सांगायला हवं”