मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. ज्यात त्यांनी, आज मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण लॉकडाऊन लागू करत नाहीये. पण दोन दिवसांत मला दृश्य स्वरूपात फरक दिसला नाही, आणि ज्यांच्याशी मी बोलतोय, त्यांच्याकडून वेगळा पर्याय दिसला नाही, तर जगात ज्या प्रमाणे लॉकडाऊनचे टप्पे जाहीर केले जातात, तसे करावे लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा उपरोधक टोला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात कोविड वाढत आहे. त्यामुळे पुणे, नागपूर सारख्या ठिकाणी काय उपाययोजना करणार आहोत हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवं होतं. राज्यात अनेक ठिकाणी बेड मिळत नाही. ते का मिळत नाहीत, त्यावर काय करणार आहोत, हे सांगणं अपेक्षित होतं. पण मुख्यमंत्र्यांनी काल केवळ विरोधकांवर टोलेबाजी करण्यात आणि टीका करण्यात वेळ घालवला., असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, कालचं भाषण काय होतं? कशासाठी होतं? हेच कळलं नाही. कारण त्यात ना कोरोना वाढण्याबाबत भाष्य करण्यात आलं, ना उपाययोजनांची माहिती देण्यात आली, असा टोमणा फडणवीसांनी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते?”
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांच मोठ वक्तव्य; म्हणाले…
“भाजपच्या ‘या’ नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश”
कोहली नंबर-1! आयसीसी एकदिवसीय रॅंकिंगमध्ये विराट कोहली अव्वल स्थानी