Home नाशिक महाराष्ट्राचं पाणी हे गुजरातला जाता कामा नये- उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचं पाणी हे गुजरातला जाता कामा नये- उद्धव ठाकरे

नाशिक : गुजरातचं पाणी आणि महाराष्ट्राचं पाणी हा विषय आता राहिलेलाच नाही. जे पाणी आपलं आहे आहे. ते गुजरातला न जाता आपल्याकडे कसं आणायचं यावर काम सुरू करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिल्या आहेत. अशी माहिती मिळाली आहे. नाशिकमध्ये विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी काल आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक होती. त्यावेळी ते बोलत होते.

गुजरातचं पाणी आणि महाराष्ट्राचं पाणी हा वादच आता राहिलेला नाही. आपल्या राज्याचं पाणी हे राज्यातील जनतेच्याच हक्काचं असून ते पाणी गुजरातला तसंच समूद्रात वाहून जाऊ नये, यासाठी काय करायला हवं ते करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राचं बरंच पाणी वाहून गुजरातला जातं आणि आपल्याला दुष्काळ सोसावा लागतो असं काही आमदारांनी मुख्यमंत्र्याना सांगितलं. यावर उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रीया दिली.

महत्वाच्या घडामोडी-

गांधींना मारणारा हिंदूच होता; उर्मिला मातोंडकरांचा हिंदुत्ववादी संघटनेवर निशाणा

माझ्या मुलाने बाबरी मशिदीबाबत केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो- अबू आझमी

कोल्हापूरात भर सभेत मुका घ्या मुका; नगरसेवकाचा स्थायी सभापतीला मुका

सांगलीत होणार १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरवात