सातारा : महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांचे सरकार हे पैसे कमविण्याच्या हेतूने एकत्र आले आहे, असं वक्तव्य माढा लोकसभेचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी केलं आहे
राज्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहे. पण कोरोना आटोक्यात आणण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे लवकरच अंतर्गत कुरघोड्यांमुळे हे सरकार पायउतार होईल, असं रणजित नाईक निंबाळकर म्हणाले आहेत.
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. कोरोनामुळे लोकांकडे पैसे नसताना सरकारने वीजबील भरण्याचा तगादा जनतेकडे लावला आहे. वीजबिल भरत नाही म्हणून वीज कनेक्शन तोडले जात आहेत. ही शरमेची गोष्ट आहे, असंही रणजित नाईक निंबाळकरांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
2 एप्रिलपासून मर्यादित लाॅकडाऊनची शक्यता; पहा काय असणार नियम
फक्त किस्से मोठे आहेत, पण मन खूप लहान; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
पवार साहेबांसारख्या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो- रोहित पवार