मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या गुप्त भेटीच्या वृत्ताने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं. आता याच मुद्द्यावरून शिवसेनेनं सामना अग्रेलखातून भाजपावर निशाणा साधला आहे.
“सध्या पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे ते भाजपाचे. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भाजपानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावं, असं शिवसेनेनं अग्रेलखात म्हटलं आहे.
फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम-दाम-दंड-भेद वापरून सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर आघात करून महाराष्ट्राचे सरकार कमकुवत करायचे, असे भाजपाचे डावपेच आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे दाबदबाव व राज्यपालांचे विशेष सहाय्य घेऊनही महाराष्ट्र सरकार जागचे ढिम्म हलायला तयार नाही. त्यामुळे विरोधकांना वैफल्याचा आजार जडला आहे. असंही अग्रलेखात म्हटलं आहे
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवारांची विचारपूस करण्यासाठी नारायण राणेंची सहकुटुंब ब्रीच कँडी रुग्णालयात हजेरी
शिवसेना का सोडली?; नरेंद्र पाटलांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…
“Video Call उचलताच तरूणी कपडे काढू लागली, आणि त्यानंतर…”
सांगलीमध्ये बिबट्याचं दर्शन; सुरक्षेसाठी राजवाडा चाैक-पटेल चाैक रस्ता बंद