“शिवसेना भवन फोडणं हे फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं नाही”

0
411

मुंबई :  वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. यावरुन शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी संताप व्यक्त केला आहे.

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणा-यांचे थोबाड फोडू . शिवसेना भवनाला हात लावणे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोप्प आहे, असं काही भाजपाच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. शिवसेना भवन हे आम्हा शिवसैनिकांचे मंदिर आहे आणि यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींचा सुगंध आहे. आमदार प्रसाद लाड हे शिवसेनेच्या मतांवर विधानपरिषद निवडणुक जिंकले आहेत. त्यांच्यावर शिवसेनेचे व शिवसेना भवनाचे उपकार आहेत. त्यांच्या तोंडी शिवसेना भवन फोडण्याची भाषा शोभत नाही, असं राजन साळवी म्हणाले आहेत.

दरम्यान, प्रसाद लाड यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देवुन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावुन दाखवा. आमचे शिवसैनिक तुम्हाला पराभवाच्या लाडूचा प्रसाद दिल्याशिवाय शांत बसणार नाही, असंही राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण…”

नागपुरमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

“राजकीय गांजाड्यांना शिवसेनेच्या फुटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही”

“आम्हांला कोणी थप्पड देण्याची भाषा करू नये, अशी थप्पड मारू की कोणी उठणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here