मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका सुरू केली. यावरुन राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल गोटे यांनी परिपत्रक काढून थेट फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
परिपत्रकातील मुद्दे-
- फडणवीसांच्या आक्रस्थाळेपणाकडे दुर्लक्ष करा!
- सत्ता हीरावून घेतल्यापासून मानसीक संतुलन ढळत चालले!
- फडणवीस सरकारमधील मंत्री हे चिंचोके गोळा खात होते का?
- फडणवीस अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज!
- स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत वाटलेल्या नोटा ‘वर्षा’वर छापल्या होत्या का?
भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांचं समर्थन करून जनतेच्या रोषाला तोंड देण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यामुळे आपल्या डरपोकपणावर शिक्कामोर्तब होऊ नये, म्हणून त्यांचे आकांडतांडव सुरू आहे. पोलीस यंत्रणेचा वापर करून विरोधकांनाच नव्हे, तर मासबेस असलेल्या ओबीसी नेत्यांना संपवण्यासाठी फडणवीसांनी पोलीस यंत्रणेला कसं वेठीला धरलं, अशा असंख्य प्रकरणांची माझ्याकडे जथ्थी आहे”, असं गोटेंनी या पत्रकात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“दलित-मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी सहभागी होईन”
एक रात्र माझ्यासोबत घालव; अंकिता लोखंडेने केला निर्मात्याबाबत धक्कादायक खुलासा
“स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”