सांगली : राज्यात काहीही झालं तरी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होते. महिन्यातून दोन तीन वेळा विरोधी पक्ष ही मागणी करतो, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
विरोधकांनी आरोप केल्यावर आम्ही गांभीर्याने घेतो, पण त्यांनी मागणी केली म्हणून कारवाई करावी असं होत नाही. मंत्रिमंडळात कोणत्याही बदलाची आवश्यकता नाही, हे आम्ही याआधीही स्पष्ट केलंय, असंही जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान, नुकतीच भाजपसह खासदार नवनीत राणा, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यावरुन जयंत पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसला मोठा धक्का! ‘हा’ माजी आमदार राष्ट्रवादीत करणार प्रवेश
“आधी खासदारकीचा राजीनामा द्या, मग महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा”
ए भाई, तू जो कोण असशील…; अमृता फडणवीसांचा भाई जगताप यांना इशारा
“…त्यामुळे राज्य सरकार बरखास्त करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”