Home महाराष्ट्र महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, केंद्र सरकारच बरखास्त करा- संजय राऊत

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, केंद्र सरकारच बरखास्त करा- संजय राऊत

मुंबई : राज्यातील विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कितीही आरोप केले तरी सरकारच्या प्रतिमेला तडे जाणार नाहीत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रात ईडी किंवा कोणतीही यंत्रणा आणून तपास केला तरी आम्हाला फरक पडत नाही. महाविकासआघाडी सरकार हे भक्कम आहे, असंही संजय राऊत म्हणाले. तसेच विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:ला खूप हुशार समजत आहे. मात्र, हे प्रकरण त्यांच्यावर बुमरँग होईल, असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिला. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस बोलतात त्या सगळ्याच गोष्टी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा कितीही गैरवापर करा, महाविकासआघाडी सरकारला धक्का लागणार नाही. भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केला. उलट केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

सचिन वाझेंना पुन्हा पोलिस दलात घेण्याचा निर्णय कोणाचा?; शरद पवारांनी केला मोठा गाैफ्यस्फोट; म्हणाले…

“शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारावं की कटाचा मास्टरमाईंड आणि वाझेंचा बाप कोण? “

आपलं सरकार कसंही वागलं तरी…; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही – जयंत पाटील