दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. निलंबन झालेले सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस दलात घेण्यात आलं. तर त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय कोणाचा होता याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माहिती दिली आहे.
सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांचाच असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप या पत्रात आहे. त्यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना आणि मला पाठवलं आहे. यात पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद करण्यात आलेलं नाही, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारावं की कटाचा मास्टरमाईंड आणि वाझेंचा बाप कोण? “
आपलं सरकार कसंही वागलं तरी…; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची गरज नाही – जयंत पाटील
परमबीर सिंग लेटर! सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू, पण…- शरद पवार