सांगली : शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर सचिन वाझे यांना निलंबित करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेवर दबाव आणून हे निर्णय घ्यायला भाग पाडले. उद्धवजी, शरद पवार हे शिवसेना संपवायला निघाले आहेत, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यभरात भाजपच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली जात आहेत. सांगलीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे सचिन वाझे यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले. संजय राठोड यांच्यामुळे सरकारची प्रतिमा मलीन होते, मग धनंजय मुंडे यांच्यामुळे होत नाही का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्यावर दबाव आणत आहे. शरद पवार हे शिवसेना संपवायचे काम करत आहेत. वाझेंना निलंबित केले जाते तर शरद पवार आता अनिल देशमुख यांना का वाचवत आहेत? उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा, असंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
हे ठाकरे सरकार जनतेचा पैसा लुटण्यासाठी बनलं आहे- निलेश राणे
भारताचा इंग्लंडला ‘दणका’ सामना जिंकत मालिकाही घातली खिशात
राज्याचे पर्यटन आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण
100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- नारायण राणे